Ad will apear here
Next
वांगी निवासी आश्रमशाळेमध्ये रक्षाबंधन
कडेगांव (जि. सांगली) : भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने  रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपल्या पालकांपासून दूर राहून निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रक्षाबंधन हा पवित्र सण असून त्यामध्ये भाऊ बहिणीच्या प्रेमाचे अतूट नाते तयार होते. आपल्या बहिणीपासून दूर असणाऱ्या मुलांना राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेविकांनी राखी बांधून त्याची उणिव भरून काढली यावेळी जवळपास ९० विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मुलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. कुलकर्णी यांनी प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी शीला मोहिते आणि महेश माळी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले व मनोगत व्यक्त केले. यावेळी आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील प्रा. अशोक माळी, प्रा. अविनाश यादव, प्रा. मंदा घाडगे, प्रा. ए. आर. वेताळ आदी मान्यवर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZRKBF
Similar Posts
कडेगावमधील कन्या महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात १५ जुलै रोजी मतदार नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानात सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
कडेगावमधील कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची पुण्यातील कंपनीत निवड भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थिनींसाठी, ११ जून रोजी नोकरभरती शिबिर आयोजित करण्यात आले होते. पुणे येथील ‘प्रोथॉम इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ या कंपनीत, निवड झालेल्या ८० विद्यार्थिनींमधील पहिली अठरा मुलींची बॅच एक जुलैपासून पुणे येथे कंपनीत रुजू झाली
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू सांगली : ‘इंडिया रँकिंग’मधील पहिल्या १२५मध्ये समाविष्ट असणाऱ्या व ‘करिअर ३६०’ या राष्ट्रीय नियतकालिकाकडून सर्वोत्कृष्ट मानांकन प्राप्त असणाऱ्या भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाची २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी ही माहिती दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language